Tuesday, 18 August 2015

भाजप- बिहार


कल्पनाविश्वात माणूस का रमतो ते कळतच नाही. तुम्ही कितीही मोठे असला, तरी प्रत्येक इंनिंग हि 'zero' पासूनच सुरु करावी लागते असे सचिन का म्हणतो, याचा विचार करावाच लागतो. दिल्ली ची आठवण करून दिली म्हणून कॉंग्रेस आणि सैनिकावर उगीच का रोष दाखवायचा? संघाने सुद्धा भाजप ला त्या पराभवावर अंतर्मुख होवून विचार करण्याचा सल्ला दिला होताच ना? म्हणून जसे आपले विचार दुसर्याने ऐकावे वाटते तसे दुसर्याचे विचार सुद्धा तितक्याच तत्परतेने ऐकावे असे वाटते. दिल्लीमधील पराभवाला, किती हि कारणे देत राहिलो तरी, नव तरुणामधील निराशा आणि असंतोष हे सुद्धा एक मुख्य कारण होतेच न? पण मग निवडणूक हरली म्हणून काय आश्वासने करायचीच नाही कि काय? ती तर करावीच लागणार, आणि नुसती करायची नाही तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न सुद्धा करावाच लागतो. तो सध्या केद्र सरकार ज्या पद्धतीने करत आहे, मला वाटत नाही मागच्या कुठल्या सरकारने ने केला असेल. तरी सुद्धा लोकामध्ये नाराजी आहे आणि त्यामुळेच काही वेळा पराभव सुद्धा होत आहे. दुख याचे आहे सरकार चांगले कार्य करीत असताना, फक्त काहीजन अनावश्यक अशी विधाने करत आहेत ज्यामुळे विरोधकांच्या हाती कोलीत मिळत आहे आणि काही मंडळी हे समजून घेण्याच्या मानसिकतेत नाही. म्हणून कुठे चुकत आहेत, याचा विचार करावाच लागेल ना? उदारहण द्यायचे झाले, १५ लाख रुपयाचे आश्वासन दिले नसताना सुद्धा चुनावी जुमला हा शब्द अमितजी ने का वापरला? ते टाळले असते तर जमले नसते का? दुसरे; शत-प्रतिशत भाजप. सध्या बिहार मध्ये ते शक्य नाही ना, मग अशी संकल्पना सध्या तरी नको वापरायला. छोटे-छोटे ४-५ पक्ष तुमच्या सोबत आहेत न आणि त्यांच्याशिवाय जिंकणे शक्य नाही ते भाजप ला माहित आहे. मग का अशी विधाने करायची? आता उगी कार्यकर्त्यांना उद्देशून केली, वगैरे असे सांगून समर्थन करू नये. कारण त्यातून, जसे महाराष्ट्रामध्ये झाले, तसे छोट्या पक्ष्यांना 'आपल्याला आता वापरून नंतर सोडून दिले जायील' असे वाटण्याची भीती असते. त्यातूनच मग असंतोषाची भावना निर्माण होतो, आणि अंतर्गत पाडापाडीचे राजकारण मग जोर घ्यायला लागते. सुदैवाने हे महाराष्ट्रात घडले नाही, पण बिहार मध्ये होऊ शकते. म्हणून अश्या विधानाची दाखल घेतली पाहिजे आणि त्यापासून दूर राहणे गरजाहे आहे. केलेली कामे जनतेपर्यंत नेवून त्यावर त्यांचा विश्वास कसा जिंकता येयील यावर लक्ष केंद्रित करावे. सुदैवाने हे सध्या भाजप चांगल्या रीतीने बिहार मध्ये करते आहे, आणि त्यात आता भरगच्च असे 'package' मिळाले आहे. त्याचा पूर्ण वापर करून सत्ता मिळावी हीच अपेक्षा!

No comments:

Post a Comment